Tuesday, February 12, 2019

`यशस्वी उद्योजक रॉबर्ट वद्रा'(???)..... यांच्याबाबतीत परवा एका चॅनलवर कार्यक्रम चालू होता. त्यातून या व्यक्तीची माहिती मिळाली ती खरोखर अचंभित करणारी आहे. सध्या या रॉबर्ट महाशयांवर इ.डी. चा फेरा आलाय. क्षणभर असे वाटून गेले कि खरंच प्रियांका गांधींचा राजकारणातील प्रवेश निष्प्रभ करण्यासाठी राबर्ट वद्रा ला टार्गेट केलं जातंय का?
        रॉबर्ट वद्रा यांचे वडील राजेंद्र वद्रा हे मूळचे सध्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोटचे. १९४७ ला फाळणीच्यावेळी हे भारतातल्या मोरादाबाद इथे स्थायिक झाले. इथे राजेंद्रांनी स्कॉटिश स्त्री बरोबर लग्न केले. या दोघांच्या तीन आपत्त्यांपैकी एक हा रॉबर्ट. वडिलांचा आणि आईचा मूळ व्यवसाय म्हणजे तांब्या पितळेची भांडी तयार करून त्यावर नक्षीकाम करणे. या राजेंद्र वाड्रांनी रिक्षा चालवल्याचीही नोंद आहे. सर्वसाधारण कुटुंबात रॉबर्ट जन्मला असला तरी त्याचे वरच्या वर्गात उठणे बसने होते. १९९१ ला अशाच एका पार्टीत राबर्ट वद्रा ची ओळख प्रियांका गांधींशी झाली. आणि हाच क्षण त्याच्या आयुष्यातील `गेम चेंजर' ठरला. वद्रा च्या `राऊडी-माचो मॅन' प्रतिमेची प्रियांका फॅन झाली. गांधी कुटुंबीयांपैकी कोणालाही या दोघांचे सम्बन्ध मान्य नव्हते पण प्रेमात आंधळे झालेल्या प्रियांकाच्या हट्टामुळे १९९७ ला रॉबर्ट आणि प्रियांका यांचे लग्न झाले. आणि यशस्वीही ठरले. रॉबर्ट वद्रा अचानक फोकस मध्ये आला, आणि सरकारी `जावई' झाला. या वद्रा महाशयांना झेड सिक्युरिटी मिळाली. इतकेच नव्हे तर आंतराराष्ट्रीय विमानतळावर व्ही.व्ही.आय.पी. दर्जा मिळून कुठल्याही सुरक्षा चौकशी शिवाय जायची यायची त्यांना परवानगी देण्यात आली. ही सुविधा फक्त अति महत्वाच्या मोजक्या राजकीय लोकांनाच उपलब्ध असते. अतिशय राजेशाही राहणीमान असलेल्या या रॉबर्ट वाड्रांनी २००७ साली एक रियल इस्टेट कंपनी स्थापन केली आणि त्याचवेळी `डी.एल.एफ.' या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून एंट्री घेतली. यावेळी राबर्ट वद्रा यांचे भांडवल होते `एक लाख' रुपये फक्त आणि एक जुनी जिप्सी गाडी. यानंतर यांचे  सगळेच व्यवहार कायमच संशयाच्या फेऱ्यात राहिले. लाखात घेतलेली जमीन करोडोत विकण्याचा करिष्मा या महाशयांनी करून दाखवला. वाड्रांच्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या ओळखीचा वापर करून अनेकांकडून पैसे कमावल्याच्याही तक्रारी आहेत. पण कोणतीही चौकशी कधीही शेवटाला पोहोचलीच नाही. रॉबर्ट वाड्रांचे आपली आई सोडून इतर कुटुंबाशी कधीच जमले नाही. रॉबर्ट वाड्रांची बहीण एका अपघातात, भाऊ आत्महत्त्येत आणि वडील हार्ट अटॅकने गेले. (या सर्व घटना संशयास्पद राहिल्या. असो.) आतापर्यंत रॉबर्ट वदरांनी १२ कंपन्या स्थापन केल्यात आणि त्यातील ६ तर गेल्या वर्षभरातील आहेत. या कंपन्यांच्या द्वारा अनेक तारांकित हॉटेल्स आणि स्कायलाईन हॉस्पिटॅलिटी अंतर्गत एक भव्य हॉस्पिटल वाड्रांनी उभे केलंय. या सर्व कंपन्या प्रत्यक्षात कुठलीही निर्मिती करत नाहीत फक्त देव-घेव व्यवहार करतात. फार खोलात जायला नको पण २००७ साली एक लाख भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाची आताची बाजारातील किंमत पंधरा हजार करोड आहे. ही ऑनपेपर किंमत. ऑफ द रेकॉर्ड किती हे अज्ञात आहे. भारतात आणि परदेशातही त्यांच्या अनेक मिळकती आहेत असे म्हणतात. रॉबर्ट वाड्रांना गाड्या खूप आवडतात. २००७ ला एक जिप्सी होती पण आता यांच्याकडे पंधरा गाड्या आहेत. त्यातील ५ गाड्यांची प्रत्येकी किंमत ही ५ कोटींपेक्षा जास्त आहे. डुकाटी सारख्या अनेक रेसर मोटारसायकल आहेत, त्यांची किंमतही कोटयवधी रुपये आहे असे म्हणतात.
       तर आता इ.डी. (परिवर्तन संचालन-आर्थिक देवघेव) ने या रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरु केली आहे. आता तुम्हीच सांगा, याला काही अर्थ आहे का? एका लाखाचे ११ वर्षात पंधरा हजार करोड करणाऱ्या या यशस्वी उद्योजकाचे कौतुक व्हायला हवे कि नाही? त्यांचा `पदमश्री' देऊन गौरव करायला पाहिजे. दोन नंबरचा व्यवसाय करू पाहणाऱ्या होतकरू उदयोजकांसमोर या महानुभवाची व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. झटपट श्रीमंत होण्याच्या त्यांच्या या कलेचे उचित कौतुक व्हायला पाहिजे........ (मध्ये आमच्या ताईंनी एक एकर शेतात वांगी लावून त्यातून दहा कोटी कमवले होते हीही कौतुकाची गोष्ट आहे)
      पण काय मोदीजी? तुम्ही बिचाऱ्याच्या मागे लागलाय. इ.डी. ने या महाशयांची झोप उडवलीय. हे बरोबर नाही. मोदीजी ही घटनेची पायमल्ली आहे. मोदीजी ताबडतोब राजीनामा द्या........ (खि..... खि......खि....) ......

@अनिल दातीर.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...