अखेर तीन प्रभागात पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कचरा संकलनाचे काम सुरु
102 वाहनाद्वारे कचरा संकलन सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी :
मनपा प्रशासनाने कचरा संकलनाचे कंत्राट बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याकरिता प्रशासनाने अनेक वेळा तारखा जाहीर केल्या परंतु प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात झाली नाही. अखेर या प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतर सोमवारी (दि. 4 फेब्रु) शहरातील तीन प्रभागात कचरा संकलनाचे काम सुरु झाले आहे. तीन प्रभागात मिळून ८५ टन ओला तर ८ टन सुका कचरा गोळा करण्यात आला.
शहरात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली. तेव्हा यावर मात करण्यासाठी मनपा प्रशासनाला शासनाने भरघोस निधीही दिला. यातून मनपाने शहरातील ९ ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे ठरवले खरे, मात्र वर्ष उलटले तरी चिकलठाणा वगळता अद्याप कोणतेही कचरा प्रक्रिया केंद्र मनपा प्रशासन सुरू करू शकले नाही. त्यात मनपाने कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा नेण्यासाठी खासगी कंपनी पी. गोपीनाथ रेड्डी यांना कंत्राट दिले. त्यानुसार कंपनी ६ जानेवारी पासून कचरा संकलनाच्या कामाला सुरूवात करणार होती. परंतु, कंपनीला कामाचा मुहुर्त मिळालेला नाही. वाहनांची पासिंग रखडल्याने काम सुरू होण्यास अडथळे येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपा प्रशासनाने सोमवार पासून कचरा संकलन सुरू करण्यासंबंधी शपथपत्र सादर केले होते त्यानुसार आज सोमवारी तीन प्रभागात का होईना पण कचरा संकलन आला प्रत्यक्षात मुहूर्त लागला.
यावेळी झोन क्रमांक 2 ,7 व 9 मधील एकूण 39 वार्डात कचरा संकलन करण्यात आले. यावेळी संकलित करण्यात आलेल्या कचरा झोन क्रमांक 9 मधील पडेगाव, सात मधील कांचनवाडी तर झोन क्रमांक दोन मधील संकलित केलेला कचरा हर्सूल येथे टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रभागनिहाय आकडेवारी
प्रभाग ७ - दोन कोंप्याक्टर ओला कचरा (२०टन), एक हायवा ओला कचरा ( ५ टन) तर एक हायवा सुका कचरा (४ टन) २६ ऑटोरिक्षा द्वारे गोळा करण्यात आला.
प्रभाग ९ - एक कोंप्याक्टर ओला कचरा (१० टन), एक टिप्पर (५ टन) तर एक हायवा सुका कचरा (४ टन) २६ ऑटोरिक्षाद्वारे गोळा करण्यात आला.
प्रभाग २ - दोन कोंप्याक्टर ओला कचरा (२०टन), सहा हायवा (३० टन) २६ रिक्षद्वारे गोळा करण्यात आला.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.