*सिल्लोड नगर परिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू*
औरंगाबाद, दि.31 (जि.मा.का.) :- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेची मुदत 2 मार्च रोजी संपत आहे. या नगर परिषदेतील अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2019 राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, त्यामुळे निवडणूकीची आचारसंहिता दिनांक 31 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत राहील. या नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहिल, असे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी कळविले आहे.
मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही. या निवडणूकीच कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी 4 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 फेब्रुवारीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरण्याकरीता उपलब्ध असतील. नामनिर्देशनपत्रे 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. शनिवार, दिनांक 9 फेब्रुवारी व रविवार, दिनांक 10 फेब्रुवारी या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. अपिल असल्यास अपिल निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी देण्यात येईल. वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्हे नेमूण देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरूवात होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. हा निकाल महाराष्ट्र शासनाच्या कलम-19 आणि 51 अ-1-अ (9) मधील तरतूदीनुसार राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी कळविले आहे.
*******

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.