नारेगाव परिसरातील अनधिकृत प्लॉटिंग उध्वस्त;मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क फोटो-नारेगाव,औरंगाबाद
औरंगाबाद/प्रतिनिधी :
नारेगाव परिसरातील ग्रीन झोन मधील सुमारे 15 ते 20 एकर जागेवरील भूमाफियांनी थाटलेली अनधिकृत प्लॉटिंग नागरीकमित्र पथकाच्या मदतीने मनपा अतिक्रमण विभागाने मंगळवारी उध्वस्त केली. अनेक दिवसांपासून पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई होत नव्हती.
नारेगाव परिसरातील गट क्रमांक 4 ते 8 व ब्रिजवाडी येथील गट क्रमांक 24, 25 मधील सुमारे 15 ते 20 एकर नॉन डेव्हलपिंग झोन, ग्रीन झोन मध्ये भूमाफियांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्लॉटिंग केली होती. या प्लॉटची सर्रासपणे विक्री केली जात होती. यातील अनेक प्लॉटची विक्री केली गेली असून, काही ठिकाणी तर बांधकामेही सुरू करण्यात आली आहेत .
अनेक वेळा मनपा प्रशासनाने येथे कारवाई करण्याचे नियोजन केले होते. परंतु कारवाई करिता पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई रखडली होती. आखिर पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने मनपा अतिक्रमण पथकाने मनपातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्त व मनपाच्या नागरी पथकातील माजी सैनिकांच्या मदतीने मंगळवारी सकाळी सहा वाजता अचानक या कारवाईला सुरुवात केली. यावेळी परिसरात असलेले रस्ते, प्लॉटिंग, ड्रेनेज लाईन प्लॉटला करण्यात आलेली तार कुंपन आदी उध्वस्त करण्यात आले. कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख ए. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, प्रभाकर पाठक, एस. एस. कुलकर्णी, विनोद पवार, शेख मजहर, सय्यद जमशेद, जे जाधव, एस. सी. कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.
नागरीकमित्र पथकातील सुमारे 30 माजी सैनिक, 6 पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात 6 जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण पथकाने 25 एकरावर असलेले प्लॉट, रस्ते, ड्रेनेज लाईन आदी उध्वस्त केले. यावेळी सुमारे एक किलोमीटरचा सिमेंट रोड ही पथकाने उध्वस्त केला. तसेच काही ठिकाणी बांधकामे चालू असल्याने बांधकामाची साहित्यही जप्त करण्यात आले.
अनेकांनी केली मालकी कागदपत्रे सादर
यावेळी कारवाई करीत असताना काही नागरिकांनी संबंधित जागेचे स्वतःचे मालकी असलेले कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखविली परंतु ग्रीन झोन या संकल्पनेबाबत त्यांना कल्पनाच नसल्याचे दिसून आले. या परिसरात प्लॉट विक्री करणाऱ्या व घेणाऱ्यानवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.