
आ.सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर निवडणुकीत उभे राहुन दाखवावे, मग मी म.शि.प्र. मंडल मधला भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवेल; खासदार खैरेंचे आ. चव्हाणांना खुले आव्हान दिले
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क।शुक्रवार,दि.१८
खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझी स्तुती करून मला प्रोत्साहन दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे म्हणून चंद्रकांत खैरे हे कर्तृत्वाने निवडून येतात असे ते म्हणतात. पक्षाच्या अध्यक्षांनीच माझे कौतुक केले आहे मात्र आमदार चव्हाण यांनी टीका टिप्पणी करण्याचे उद्योग सुरू केले आहे. ते त्यांनी करू नये. आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर उभेच राहावे आणि मग मी त्यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि देवगिरी महाविद्यालयात दिलेल्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नौकऱ्यातील भ्रष्टाचार बाहेर काढतो असे खुले आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सामना मिडीया न्युज नेटवर्कशी बोलतांना केले.
राष्ट्रवादीच्या परिवर्तन निर्धार यात्रेनिमित्ताने आमदार चव्हाण यांनी जिल्ह्यातील १६ लाख मतदार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असून त्यांचा पराभव निश्चित असल्याने औरंगाबाद लोकसभा लढविण्यास इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे असे विधान आज माध्यमांशी बोलतांना केले. यावर ऊत्तर देत शिवसेना स्टाईल ने उत्तर देत चव्हाण यांच्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी तोफ डागली.
खा. खैरे म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ढवळाढवळ करू नये, हा माझा त्यांना मौलिक सल्ला आहे. त्यांना उमेदवारी मिळतेच की नाही हेच स्पष्ट नाही, मात्र तरीही त्यांनी माझ्यासमोर उभे राहून दाखवावे आणि मग मी त्यांना पुराव्यानिशी सांगेल की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचारी भरती प्रकरणी किती भ्रष्टाचार झाला आहे ते. आगामी निवडणुकीत शिक्षण संस्थेतील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे खैरे म्हणाले.
आमदार सतीश चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शहरातील कचरा, पाणी, तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहे. खासदार खैरे यांना टोला लगावत त्यांनी पिठाची गिरणी तरी आणली का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला यावर खैरें यांनीही जशास तसे उत्तर आमदार चव्हाणांना दिले.
आता आगामी लोकसभा विधानसभा तोंडावर येताच औरंगाबाद जिल्हय़ातील राजकारण मात्र तापत आहे.
जनतेच्या कौल कोणाला साथ देणार हे मात्र आता सांगने योग्य ठरेल का? हे स्पष्ट सध्या तरी नाही.
आज ही निकाल लो ना खासदार साहब
ReplyDelete