Monday, January 14, 2019

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 25 व्या नामविस्तार दिनानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत बाबासाहेबांच्या प्रकाश आंबेडकरांविषयी  मिलिंद शेळके यांनी  अपशब्द वापरल्यामूळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळण्याचा प्रयत्न सोमवारी (ता.14) रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदनावर रिपाई आठवले गटाचा नामविस्तार दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले)गटाचे पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके यांनी भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता  बाबासाहेबांचे नातू असा उल्लेख करून  ते म्हणाले, नामांताराच्या लढ्यात व खैरलांजीचे प्रकार झाल्यानंतर हे कुठचे दिसले नाहीत . तसेच  त्यांनी एक अपशब्दही उच्चारला  . या वरून सभेत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला .  खुर्च्याची तोडफोड केली . हा गोंधळ बराच वेळ चालला .  सभा उधळण्याचाही  प्रयत्न झाला .

यामूळे  गोंधळ उडाला होता. मात्र पक्षाचे नेते बाबुराव कदम यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर पुढील कार्यक्रम झाला.  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  समाजातील कोणत्याही नेत्यावर  नाव घेऊन  तसेच पातळी सोडून टीका करू नका अशा सूचना आपल्या भाषणात दिल्या .

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...