वाळूज एमआयडीसीत उद्योग संकल्प दिन साजरा
Photos-Baig Mushtak Mirza,Aurangabad
एम.एन.बेग
वाळूज/ प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसीत आज ९ आॅगस्टला औद्योगिक संघटनाच्यावतीने ‘उद्योग संकल्प दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व प्रलंबीत प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.
येथील मराठवाडा आॅटो क्लस्टर मध्ये आयोजित कार्यक्रमाला उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद
, उद्योजक राम भोगले, पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल,
उपायुक्त निकेश खाटमोडे, एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गतवर्षी ९ आॅगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला वाळूज उद्योगनगरीत झालेल्या तोडफोडीच्या घटनेला उजाळा देण्यात आल्या. उद्योगनगरीत भविष्यात अशा घटना घडु नये, यासाठी उद्योजकांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.
यावेळी उद्योजक सुनिल किर्दक यांनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते तयार करणे, प्रत्येक सेक्टरमध्ये स्वच्छतागृह उभारणे, सिमेन्स कॉर्नर, कामगार चौक आदी ठिकाणी उड्डाणपुल उभारणे आदींची मागणी केली. विलास चौधरी यांनी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखण्याची मागणी केली. उद्योजक राम भोगले यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मनोगत व्यक्त करीत गतवर्षी औद्योगिक क्षेत्रात तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने उद्योजकांना चांगल्या प्रकारे मदत केल्याचे सांगितले. या प्रसंगी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी औद्योगिक क्षेत्रातील स्वतंत्र पोलिस स्टेशन संदर्भात वरिष्ठाकडे पाठपुरावा सुरु असून तात्काळ या ठिकाणी शेड उभारुन पोलिस चौकी सुरु करुन अधिकारी व कर्मचाºयांची नेमणुक करणार असल्याचे सांगितले. औद्योगिक परिसरात ठिक-ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अतुल सावे यांनी उद्योजकांनी सुरक्षेसाठी पोलिस व एमआयडीसी प्रशासनावर अवलंबुन न राहता स्वत:हून सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षेसाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या संदर्भात मुंबईत पुढील आठवड्यात चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष जाजु व सूत्रसंचालन शिवप्रसाद जाजु यांनी मानले. कार्यक्रमाला एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, विलास चौधरी, दीपक मॅथ्यु, प्रसाद कोकीळ, संजय मोदक, लक्ष्मीकांत कदम, अशोक गवारे, रोहित पाटील, सुदर्शन सांगळे, हेमंत निकम, रोहित दाशरथी, अनंत आढाव आदीसह सीएमआयए, सीआयआय, मसिआ, लघु उद्योग भारती, डब्ल्यआयए, आयसा, एजेव्हीएम व बिमटा आदी संघटनाचे पदाधिकारी व अनेक कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाºयांची उपस्थिती होती.