Saturday, July 27, 2019

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात औरंगाबाद शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
                  Photo-Baig Mushtak Mirza

औरंगाबाद/प्रतिनिधी : अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटामध्ये वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ६२ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दि. १६ जुलै ते २० जुलै यादरम्यान पार पडला. यात देशभरातील ३० राज्य पोलीस संघाचे १२५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये विविध राज्यांचे संघ, केंद्रीय पोलीस दल, निमलष्करी दले यांचाही सहभाग होता. या कर्तव्य मेळाव्यात सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, संगणक माहिती, घातपात विरोधी तपासणी, श्वान पथक स्पर्धा अशा सहा प्रकारामध्ये हि स्पर्धा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र पोलीस दलाने या स्पर्धेत ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कस्य पदके अशी एकूण १२ पदके पटकावून गणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करून विजेतेपद पटकावले.

औरंगाबाद शहर पोलीस दलाचा या स्पर्ध्यामध्ये मोलाचा वाटा होता. सायबर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलिस निरीक्षक राहुल हरिभाऊ खटावकर यांनी
सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन या स्पर्धा प्रकारात क्रिमिनल लॉ आणि प्रोसिजर विषयामध्ये मध्ये कांस्य पदक पटकाविले. तसेच सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन स्पर्धेची हार्डलाईनवर ट्रॉफी मिळविली. राहूल खटावकर यांनी महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात १ सुवर्ण व
०३ रजत पदके पटकाविली होती.
पो.कॉ मन्सुर ईब्राहिम शहा यांनी अब्जार्वेशन टेस्ट या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला ०३ सुवर्ण पदके प्राप्त करुन देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.
औरंगाबाद शहर पोलीस दलाचे श्वान (मौना) व त्यांचे हॅन्डलर पोहेकॉ अतुल मोरे व सुभाष गोरे यांनी नार्कोटिक या ट्रेडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, सुबोधकुमार जायस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी,
गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी महाराष्ट्र पोलीस संघाचा सत्कार केला.

सपोनि, राहुल खटावकर, पोहेकॉ अतुल मोरे, सुभाष गोरे व पोकॉ. मन्सूर शहा यांचा औरंगाबाद शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सत्कार करून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. चिरंजीव प्रसाद, तत्कालीन पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. दिपाली धाटे घाडगे, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १), डॉ. राहल खाड़े पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) व डॉ. नागनाथ कोडे, सहा. पोलीस आयुक्त
(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...