Saturday, July 27, 2019

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात औरंगाबाद शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
                  Photo-Baig Mushtak Mirza

औरंगाबाद/प्रतिनिधी : अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटामध्ये वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ६२ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दि. १६ जुलै ते २० जुलै यादरम्यान पार पडला. यात देशभरातील ३० राज्य पोलीस संघाचे १२५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये विविध राज्यांचे संघ, केंद्रीय पोलीस दल, निमलष्करी दले यांचाही सहभाग होता. या कर्तव्य मेळाव्यात सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, संगणक माहिती, घातपात विरोधी तपासणी, श्वान पथक स्पर्धा अशा सहा प्रकारामध्ये हि स्पर्धा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र पोलीस दलाने या स्पर्धेत ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कस्य पदके अशी एकूण १२ पदके पटकावून गणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करून विजेतेपद पटकावले.

औरंगाबाद शहर पोलीस दलाचा या स्पर्ध्यामध्ये मोलाचा वाटा होता. सायबर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलिस निरीक्षक राहुल हरिभाऊ खटावकर यांनी
सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन या स्पर्धा प्रकारात क्रिमिनल लॉ आणि प्रोसिजर विषयामध्ये मध्ये कांस्य पदक पटकाविले. तसेच सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन स्पर्धेची हार्डलाईनवर ट्रॉफी मिळविली. राहूल खटावकर यांनी महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात १ सुवर्ण व
०३ रजत पदके पटकाविली होती.
पो.कॉ मन्सुर ईब्राहिम शहा यांनी अब्जार्वेशन टेस्ट या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला ०३ सुवर्ण पदके प्राप्त करुन देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.
औरंगाबाद शहर पोलीस दलाचे श्वान (मौना) व त्यांचे हॅन्डलर पोहेकॉ अतुल मोरे व सुभाष गोरे यांनी नार्कोटिक या ट्रेडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, सुबोधकुमार जायस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी,
गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी महाराष्ट्र पोलीस संघाचा सत्कार केला.

सपोनि, राहुल खटावकर, पोहेकॉ अतुल मोरे, सुभाष गोरे व पोकॉ. मन्सूर शहा यांचा औरंगाबाद शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सत्कार करून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. चिरंजीव प्रसाद, तत्कालीन पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. दिपाली धाटे घाडगे, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १), डॉ. राहल खाड़े पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) व डॉ. नागनाथ कोडे, सहा. पोलीस आयुक्त
(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.


आज मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची सुहास दाशरथे सह संपर्क प्रमुख व उपजिल्हा प्रमुख अनिल पोलकर यांनी भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Friday, July 26, 2019

उद्योजकासोबत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील: उद्योग राज्यमंत्री सावे
         Photo- BAIG MUSHTAK MIRZA
दिनांक-27 जुलै 2019
एम.एन,बेग मिर्जा ।औरंगाबाद।एमआयडीसीच्या मराठवाडा लेवल वरील सर्व अधिकाऱ्यांची
 उद्योजकांसोबत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री ना.अतुल मोरेश्वर सावे यांनी शुक्रवारी,26 जुलै रोजी झालेल्या चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरच्या बैठकीत दिले.
 चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरची  महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नुकतेच उद्योगमंत्री म्हणून निवड झालेले उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना याप्रसंगी विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदने देण्यात आली. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री अतुल सावेनी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, मी आतापर्यंत शहरात रस्ते विकास साठी सुमारे 125 कोटी रुपये आणले, कचरा व्यवस्थापनसाठी 100 कोटी रुपये आणले,तसेच आता नवीन पाणी पुरवठा योजना देखील करत आहोत, या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहे, आणि त्याच बरोबर आता लवकरच जपान, चीन, युएई, येथील नवीन कंपन्याचे  मालक आँगस्ट महिन्यात आपल्या शहरातील शेंद्रा एमआयडीसीमध्ये गुंतवणूकीसाठी येत आहेत.

पंतप्रधान मोदी सरकारने 35 हजार स्किल डेव्हलपमेंटच्या शाखा उघडल्या आहेत. त्याचा देखील चांगलाच  फायदा होईल. सुनील चौधरी यांनी हॉटेल इंडस्ट्री संदर्भातील प्रश्न कार्यक्रमात मांडले,उद्योगमंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना म्हणाले की त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले,
यावेळी उद्योजक राम भोगले, सीएमआएचे अध्यक्ष संगरीया, कमलेश धुत, प्रतिश चँटजीँ,अजिंक्य सावे यांच्या सह अनेक उद्योजकांची विशेष रूपाने  उपस्थित होते.औरंगाबाद।एमआयडीसीच्या मराठवाडा लेवल वरील सर्व अधिकाऱ्यांची
 उद्योजकांसोबत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री ना.अतुल मोरेश्वर सावे यांनी शुक्रवारी,26 जुलै रोजी झालेल्या चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरच्या बैठकीत दिले.


 चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरची  महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नुकतेच उद्योगमंत्री म्हणून निवड झालेले उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना याप्रसंगी विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदने देण्यात आली. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री अतुल सावेनी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, मी आतापर्यंत शहरात रस्ते विकास साठी सुमारे 125 कोटी रुपये आणले, कचरा व्यवस्थापनसाठी 100 कोटी रुपये आणले,तसेच आता नवीन पाणी पुरवठा योजना देखील करत आहोत, या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहे, आणि त्याच बरोबर आता लवकरच जपान, चीन, युएई, येथील नवीन कंपन्याचे  मालक आँगस्ट महिन्यात आपल्या शहरातील शेंद्रा एमआयडीसीमध्ये गुंतवणूकीसाठी येत आहेत. पंतप्रधान मोदी सरकारने 35 हजार स्किल डेव्हलपमेंटच्या शाखा उघडल्या आहेत. त्याचा देखील चांगलाच  फायदा होईल. सुनील चौधरी यांनी हॉटेल इंडस्ट्री संदर्भातील प्रश्न कार्यक्रमात मांडले,उद्योगमंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना म्हणाले की त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले,
यावेळी उद्योजक राम भोगले, सीएमआएचे अध्यक्ष संगरीया, कमलेश    धुत, प्रतिश चँटजीँ,अजिंक्य सावे यांच्या सह अनेक उद्योजकांची विशेष रूपाने  उपस्थित होते.

For more details plz SUBSCRIBE TO ✒🎤👉YUVA SAMNA MEDIA
To advts-plz contact on 8668620106,8793666376

Wednesday, July 3, 2019

*यशस्वी सापळा कारवाई*ANTI CORRUPTION BEURO

➡ युनिट      :- औरंगाबाद
➡ तक्रारदार :- पुरुष वय 45 वर्षे, व्यवसाय- खाजगी व्यापार.5
➡ आरोपी    :- 1) गजेंद्र तुळशीराम इंगळे, वय- 33 वर्ष, नोकरी- पोलीस उपनिरीक्षक,(Class- 2) पोलीस ठाणे गंगापूर,
Gajendra Ingle PSI

2) समीर नासिर पठाण, वय 29 वर्ष, रा, मन्सूरी कॉलोनी गंगापूर (खाजगी इसम)


➡ लाचेची मागणी:- यातिल आलोसे क्र. 1 यांनी लाचेची मागणी करून लाचेची रक्कम Accused no. 2 यांचेकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे Accused no. 2 यांनी 30,000/- Rs. लाचेची रक्कम स्विकारली.
     
➡ लाच स्विकारली/जप्त रक्कम :-  30000 ₹       
➡ कारण:-
         आलोसे क्र. 1 यांचेकडे कलम 341 च्या तपासावर असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी
➡ पडताळणी दिनांक :-
            03/07/2019
लाचेची मागणी पोस्टे गंगापुर येथील पोउपनि यांचे कक्षात
➡ यशस्वी सापळा दिनांक :- 03/07/2019 रोजी न्यु जनता टि हाऊस, गंगापुर न्यायालयाचे जवळ गंगापुर या ठिकाणी
➡ आरोपी :- लाचेच्या रकमेसह ताब्यात.

➡TLO:- DySP श्री बी. व्ही. गावडे,
➡SO:- Dysp, श्री सुजय घाटगे, आणि ला.प्र.वि. टिम. औरंगाबाद

Friday, June 7, 2019

खासदारांचे नाव न टाकल्याने उद्या उद्यानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार करून उध्वस्त करू- अरूण बोरङे यांचा ईशारा

औरंगाबाद-युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क
  मनपा औरंगाबाद येथे उद्या प्राणी संग्रहालयातील
वाघाच्या चार बछङयाचे नामकरण सोहळा होणार असल्याचे माहिती मिळताच एम.आय.एम चे विरोधी पक्ष नेता सरिता अरूण बोरङे यांनी मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि उद्या कार्यक्रमावर निषेध करून उध्वस्त करू असा ईशारा सरिता अरूण बोरङे यांच्या कङुन देण्यात आला.
मनपात जातिवाद संदर्भात फक्त विकास कामांतच जातिभेद दिसुन येते सोबत नाव न टाकलयाचे राजकारण आता पेटण्याची तयारी दिसते.
आता मनपा पत्रिका बदलते का यावर शहर वासियाचे लक्ष वेधले आहे.

हिच ती छापलेली पत्रिका


Sunday, June 2, 2019

‘मुंबई-दिल्ली’ महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण – नितिन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्याचा समावेश आहे. मोदींच्या केंद्रीय मंत्रिपदमध्ये सलग दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच येणाऱ्या काळातील  देशभरात महामार्गाच्या विकास कामाबद्दल त्यांनी पत्रकारांना आराखडा सांगितला.
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुंबई दिल्ली महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच त्यांनी देशभरात महामार्गाच्या शेजारी 125 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस असल्याचंही सांगितलं

Friday, May 31, 2019

रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात:-

● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.

● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.

● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

● दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पर्यत पाठवा. धन्यवाद🙏🙏🙏🙏

*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर - २० रू . किलो*
*तुरदाळ- ३५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करन्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा. आरबीएम वृत्त वाहिनी महाराष्ट्र (RBM news Maharashtra) तुमच्या सोबत. जाहिरात व बातम्या.  प्रसारीत करण्यासाठी संपर्क ९९७०२२८२३६ करा. आम्ही तुमची नक्कीच मदत करू.
भारत सरकार द्वारा जनहीतार्थ जारी.........वरील माहीती ग्रामिण भागातिल शेतकरी,शेतमजुर ,अश्या गरजवंतापर्यंत पोहचवा रौकेल दुकानदार व स्वास्थ्य धान्य दुकानदार माल नाही देत असेल तर त्यांची तक्रार करा. सतीशभाऊ लोणारे सदस्य अन्नधान्य वितरण ग्राहक मंत्रालय भारत सरकार 9422822675.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...