Sunday, March 24, 2019

माढ्याचा तिढा अखेर सुटला; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी, संजय शिंदेंशी होणार सामना
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांचा तिढा अखेर सुटला आहे.
भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रणजितसिंह निंबाळकर हे सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे, पण उद्या दे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्याचे तिकीट देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर विरूद्ध संजय शिंदे असा थेट मुकावला पाहायला मिळणार आहे. तत्पुर्वी माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार अस जाहीर झालं होत, पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की होती. पण त्यांचे सुपूत्र रणजितसिंब मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. यानंतर भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना मैदानात उतरवणार असे सगळ्यांना वाटत होते, पण भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकीट दिले.

Saturday, March 23, 2019

औरंगाबाद शहरात श्री संस्थान गणपतीची आरती करून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोनगावकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभयसिंग गायकवाड, मनपा स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, नगरसेवक ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, राजेंद्र दानवे, ऋषिकेश जैस्वाल, तसेच शिवसेना महिला आघाडी च्या पदाधिकारी यांची उपस्तीती होती. यावेळी शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नाशिक येथून बोलविण्यात आलेल्या ढोल पथकांनी विशेष लक्ष वेधले. जय भवानी, जय शिवाजी च्या जय घोषात परिसर दुमदुमला.
काँग्रेसमध्ये कुणी ऐकत नाही; अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत
                         फोटो-बेग मुश्ताक मिर्झा
विशेष बातमी- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, दिल्ली
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षातील इतर नाराजही पक्ष सोडत आहेत. आता खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणच नाराज असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पक्षात कुणी आपले ऐकत नसल्याने राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, अशी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात काँग्रेस अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि एक कार्यकर्ता बोलत असल्याचा दावा करत एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. यात चंद्रपूरच्या उमेदवारीवर बोलताना चव्हाण यांनी पक्षात आपले कुणीही ऐकत नाही. त्यामुळे आपणच राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्षच नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले की, ते खासगी संभाषण असून पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. यातील सगळे अंतर्गत विषय आहेत. चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मी क्लिप ऐकलेली नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्याचे माझे काम आहे. चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चंद्रपूरचा वाद काय?
चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत मोठ्या घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित झाले. परंतु, पुन्हा त्यांचे नाव मागे पडले आणि हंसराज अहिर यांच्या विरोधात विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चंद्रपुरातील काँग्रेस मंडळी नाराज झाली. खुद्द चव्हाण हे शिवसेनेचे आमदार बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही होते. परंतु, उमेदवारी बांगडेंना जाहीर झाल्याने चव्हाणांकडे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
'मैं भी चौकीदार' म्हणणारे वकील अडचणीत, बार काउन्सिल ऑफ इंडियासह अन्य संस्थांकडे तक्रार

 'मैं भी चौकीदार' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी मोहिमेनं वकिलांना अडचणीत आणलं आहे. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या वकिलांविरोधात मुंबईतील एका वकिलाने थेट बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली आहे. वकिली व्यवसायात असताना अन्य व्यवसायाचा उल्लेख वकील करु शकत नाही, असा दावा अॅड. एजाज नक्वी यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आला आहे.

बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार कोणत्याही वकिलाला वकिली क्षेत्रात असताना अन्य व्यवसाय किंवा नोकरी करता येत नाही. मात्र असे असतानाही अनेक वकिलांनी आपल्या सोशल मीडियावरील नावाच्या आधी 'चौकीदार' असं लिहिलं आहे. यामुळे नियमाचा तर भंग होतच आहे, त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातही वकिली व्यवसायाबाबत दिशाभूल निर्माण होत आहे, असा दावा या तक्रारीमध्ये केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाला पाठविलेल्या या आठ पानी पत्रामध्ये सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकिलांचा उल्लेखही करण्यात आला आहे.

अशाप्रकारे स्वत:ला चौकीदार म्हणवून वकिलांनी दुसरा व्यवसाय स्वीकारल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा या तक्रारीत केला आहे. वकील हा एकप्रकारे न्यायालयाचा अधिकारी असतो, त्याने कायद्याच्या अमंलबजावणीबाबत कार्यशील असायला हवे. कायद्याच्या हितासाठी दक्ष असायला हवे, त्यामुळे अशाप्रकारे न्यायक्षेत्राला बाधक ठरणारी कृती करण्यास त्यांना मनाई करावी, अशी मागणी तक्रारीमध्ये अॅड. एजाज नक्वी यांनी बार कौन्सिलकडे केली आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टीदाखल त्यांनी काही नावे आणि मोबाईलचे काही स्क्रीन शॉटसही तक्रारीसोबत जोडले आहेत. बार कौन्सिलसह महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलकडेही याबाबत रितसर तक्रार करण्यात आली आहे.
नाशिक फाटा येथे ३६ लाखाचे ब्राऊन शुगर पकडले

विक्रीसाठी आणलेले तब्बल ३०० ग्राम वजनाचे ३६ लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर पिंपरी-चिंचवडच्या आमली विरोधी पथक आणि खंडणी, दरोडा विरोधी पथकाने जप्त केले आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर पकडण्याची ही पहिलीच कारवाई आहे. शनिवारी दुपारी नाशिक फाटा, कासारवाडी येथे ही कारवाई करुन एका महिलेस अटक केली आहे.कलाराणी पोरीमसी देवेंद्र (५२, रा. म्हाडा बिल्डिंग, सायन, कोळीवाडा) या महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी नाशिक फाटा येथे एक महिला मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक श्रीराम पोळ, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक वसंत मुळे, पुरुषोत्तम चाटे, राजेंद्र बांबळे, काळे, खेडकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिची कसून झडती घेतली असता तिच्याकडे ३०० ग्राम वजनाचे ३६ लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आढळून आली. हे ब्राऊन शुगर तिने विक्रीसाठी आणले होते. पोलीस तपास करत आहेत.
उस्मानाबादमध्ये ओमराजेंच्या उमेदवारीवरुन वाद, शिवसैनिकांचा विरोध

ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील.

ऐनवेळी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड समर्थक शिवसैनिकांनी थेट उध्दव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. सोमवारपर्यंत ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा लोकसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील.
शिवसेनेचे काम न करता ओम राजेनिंबाळकर यांना अस्मान दाखविले जाईल अशी टोकाची भूमिका यावेळी शेकडो शिवसैनिकांनी घेतली. व्यासपीठावर बाबाजी भोसले नामक शिवसैनिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, धनंजय मुसांडे, बाजार समितीचे सभापती सुलतान शेठ, शहरप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, डॉ. शोभा बोंगरगे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
खासदार गायकवाड यांना डावलल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात तडकाफडकी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला लातूर, औसा, बार्शी, उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा, निलंगा आदी तालु्नयातील हजारो शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक शिवसैनिक आपल्या संतप्त भावना आक्रमकपणे व्यक्त करीत होता.
उमेदवार ताबडतोब बदला, खासदार गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी द्या अन्यथा सामुहिक राजीनामे दिले जातील, असा सूर प्रत्येकाच्या बोलण्यातून उमटत होता. शिवसैनिकांच्या भावनेची कदर न केल्यास राजेनिंबाळकरांच्या विरोधात प्रचार केला जाईल, अशी ठाम भूमिकाही अनेकांनी जाहीररीत्या यावेळी मांडली. आपल्या संतप्त भावना मातोश्रीवर पोहचविण्याकरिता शिवसैनिक शनिवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मागील लोकसभा निवडणुकीत अडीच लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेल्या रवींद्र गायकवाड यांना डावलण्यामागे कारण काय, असा ठोक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांचा शिवसैनिकांनी शेलक्या शब्दात यावेळी उध्दार केला. या मेळाव्यास मतदार संघातील अनेक जुने निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांनी जाहीररित्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव हे देखील आवर्जून या मेळाव्यास उपस्थित होते. मात्र खासदार रवींद्र गायकवाड आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे. तो देखील उमरगा-लोहारा मतदार संघातून विजयी झाला आहे. जेथे शिवसेनेचे सर्वाधिक प्राबल्य आहे, तेथील उमेदवाराला डावलल्यामुळे दोन्ही तालु्क्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जोवर रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी दिली जात नाही, तोवर अर्धनग्न राहणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. तत्काळ अर्धनग्न आंदोलनास सुरूवात देखील केली. गायकवाड यांच्या उमेदवारीचा विचार न केल्यास सेनेचा पराभव निश्चित होणार, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या

Friday, March 22, 2019

पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंड तडीपार

खडक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. राहूल श्रीनिवास रागीर (२०, घोरपडे पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळ्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत. त्यानुसार रागीर याला तडीपार करण्यात आले आहे.
राहूल रागीर हा खडक पोलीसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी २०१७ मध्ये त्याच्याकडून १ वर्ष मुदतीत चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रही करण्यात आले होते. तो अत्यंत खुनशी, क्रूर व भांडखोर आहे. तो लोकांसोबत कुरापती काढून भांडण करतो. त्यामुळे परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे नागरिक त्याची तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्याच्या या कृत्यांमुळे परिसरातील शांतता व नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...