राष्ट्रवादीचे होर्डींगबाजीत ‘परिवर्तन’, सुरू लोकसभेसाठी चमकोगीरीचा ‘निर्धार’ चे चित्र.

युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क।मंगळवार, दि.१७ जानेवाजाने2019
परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे असे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तनाचा ही संवाद यात्रा गंगापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्तीतीत सोमवारी (ता.२१) आयोजित केली आहे. यासाठी संयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद शहरापासून तर गंगापूर तालुक्यात मोठी “होर्डिंगबाजी” करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी लोकसभेसाठी आमदार चव्हाणांनी पक्षात आपली ताकद दाखवण्यासाठी या चमकोगिरीचा “निर्धार” केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
औरंगाबादच्या लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस ने या मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवला आहे लोकसभाही काँग्रेसने लढवली आहे मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेस ने पुन्हा जोर लावला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून या मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुभाष झाम्बड हे निवडणूक लढवत असल्याचे संकेत मिळत आहेत. यावर जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनीही हा मतदार संघ राष्ट्रवाडीच्या ताब्यात कसा देणार? असा प्रश्नही उपस्तीत केला. आमदार झाम्बड यांनी विकासकामे तसेच अनेक बैठक घेऊन मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढविला आहे. आघाडीत बिघाडी झाल्यास किंवा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार खैरे यांना धोबीपछाड करण्यास आमदार सतीश चव्हाण यांनी दंड थोपटले आहेत. आणि वेळोवेळी खासदार खैरेंचा पराभव मीच करू शकतो असाही विश्वास आमदार चव्हाणांनी बोलून दाखविला आहे. यानुसार आता आमदार चव्हाणांनी आपले शक्ती प्रदर्शन करत विजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या खांद्यावर प्रचाराची बंदूक ठेऊन जनसंपर्काच्या गोळ्या मारणे सुरू केल्याचे त्यांनी केलेल्या ” होर्डिंगबाजी” वरून दिसून येत आहे.
परिवर्तन यात्रेच्या जाहिर सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते
आमदार चव्हाण यांनी निर्धार परिवर्तन संवाद यात्रेच्या जाहीर सभेसाठी गंगापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ, आ.जयंत पाटील, आ. अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे, माजी आ. सुनील तटकरे, फोजिया खान, नवाब मलिक यांना निमंत्रीत केले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व शस्रांचा वापर मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत या “निर्धार परिवर्तनाचा” संपर्क यात्रेच्या निमित्ताने केल्याचे दिसून येत आहे.
Like And comments on news Also Plz Subscribe to updates videos news on channel YUVA SAMNA MEDIA.
Like And comments on news Also Plz Subscribe to updates videos news on channel YUVA SAMNA MEDIA.