आयुक्तांचे स्वागत नगरसेविकेलाही पडले महागात
फोटो-युवा सामना मिडिया न्युज नेटवर्क औरंगाबाद.
आयुक्तांसमोर जातांना जरा विचार करून जावे, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दबक्या आवाजात चर्चा
प्लास्टिक पॅकिंगमध्ये पेन आणल्याबद्दल पाचशे रुपयांचा दंड
औरंगाबाद / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (दि.9) पदभार घेताच प्लास्टीक कॅरिबॅगमध्ये पुष्पगुच्छ आणलेल्या नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. याची चर्चा थांबत नाही तोच दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.10) भाजपच्या नगरसेविकेलाही आयुक्तांनी दणका दिला. गिफ्ट देण्यासाठी प्लास्टीक कव्हरमध्ये पेन आणलेल्या नगरसेविका मनिषा मुंडे यांनाही 500 रूपये दंडाची पावती फाडावी लागली. यामुळे पालिकेत आता चुकीला माफी नाही हे आयुक्तांनी कृतीतून दाखवून दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात प्लास्टीक बंदीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. अस्तिककुमार पाण्डेय यांनी आयुक्तपदाची सूत्रे हातात घेताच प्लास्टीक बंदीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. प्लास्टिक वापरताना कोणी निदर्शनास आले तर स्वतः आयुक्त त्यांना दंड आकारत आहे. सोमवारी आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी पुष्पगुच्छ घेवून आयुक्तांचे स्वागत करण्यास त्यांच्या दालनात जात होते. दरम्यान, नगररचना विभागाचे सहायक संचालक आर. एस. महाजन हे आपल्या सहकार्यांसह आयुक्तांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून पुष्पगुच्छ घेवून गेले. प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून आणलेले पुष्पगुच्छ समोर येताच आयुक्तांनी त्यांना पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला. त्यानुसार महाजन यांच्याकडुन जागेवर दंडही वसुल केला. याची चर्चा थांबत नाही तोच मंगळवारी सकाळी भाजपच्या नगरसेविकेला प्लास्टीक वापराचा दंड भरावा लागला. भाजपचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा नगरसेविका मनिषा मुंडे यांनी आयुक्तांना पेन गिफट केला. मात्र हा पेन प्लास्टिक गिफ्ट पेपरमध्ये पॅकींग करून आणला होता. त्यावर प्लास्टीकचे कव्हर असल्याचे दिसताच आयुक्तांनी आपल्या स्वीय सहायकांना बोलावून मुंडे यांना 500 रूपये दंडाची पावती दिली. तसेच दंडही वसूल केला. या प्रकारामुळे आता पालिकेत नियम डावलून काम करणाऱ्यांना माफी नाही अशी जोरदार चर्चा प्रशासकीय इमारतीत सुरू होती.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.