जागोजागी कचऱ्याचे ढीग, अनधिकृत बांधकामे पाहून आयुक्त पांडेय संतापले ; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी
आरेफ कॉलनीत सर्वत्र फिरून आयुक्तांकडून पाहणी
औरंगाबाद/प्रतिनिधी
मनपाचे नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी पदभार घेताच पहिला दणका अधिकाऱ्यांला दिल्याने प्रत्येकाला त्यांच्या कार्यपद्धतीची चुणूक लागली आहे. मंगळवारी (दि.१०) दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी आरेफ कॉलनीत फिरून पाहणी केली. या कॉलनीत जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, अनधिकृत बांधकामे, मालमत्ता कर आकारणी न झाल्याचे पाहून आयुक्त अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. परवानगी न घेणाऱ्या बांधकामावर तात्काळ कारवाई करून कर आकारणी करा तसेच दोन दिवसात परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेचे नवीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे मंगळवारी सकाळी ८ वाजता थेट वॉर्डातील पाहणी करण्यासाठी मनपाच्या प्रभाग क्रमांक एक मधील आरेफ कॉलनीत धडकले. टॉऊन हॉलपासून त्यांनी पाहणीला सुरुवात केली. आरेफ कॉलनीत जाताच मोठया प्रमाणावर बांधकामे सुरु असल्याचे निदर्शनास आले. या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे का? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना करताच अधिकाऱ्यांनी परवानगी न घेता बांधकामे सुरु असल्याचे सांगितले. रस्त्यावर टाकण्यात आलेले बांधकाम साहित्य, त्यानंतर रस्त्यावरुन जाताना जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहताच या भागात स्वच्छता होत नाही का? प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. कचरा उचलून स्वच्छता करावी, कचरा टाकण्यासाठी डस्टबीन ठेवाव्यात, नागरिकांकडून डस्टबीनमध्ये कचरा टाकला जात नसेलतर त्यांना जागेवर दंड करावा अशी सूचना केली आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्यासोबत नगररचनाचे सहायक संचालक आर. एस. महाजन, कर निर्धारक व संकलक अधिकारी करणकुमार चव्हाण, वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. ख्वाजा, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नंदकिशोर भोंबे, नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे आदी अधिकारी उपस्थिती होते.
टोलेजंग इमारती मात्र कर आकारणी नाही
आरेफ कॉलनीत टोलेजंग इमारती पाहून आयुक्त पांडेय अवाक झाले. या मालमत्ताना कर आकारण्यात आला आहे का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला मात्र, अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. इमारतींना कर आकरण्यात आला नसेलतर व्यावसायिक कर आकरणी करुन डिमांड नोट द्या, या भागातील कर वसुल झालाच पाहिजे, अशी तंबी आयुक्त पांडेय अधिकाऱ्यांना दिली.
खाम नदी पात्रात अतिक्रमणे
आरेफ कॉलनी नजीक असलेल्या खाम नदी पात्रात अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याचे पाहून आयुक्तांचा चांगलाच पारा चढला. नदीपात्रात एवढे अतिक्रमण होत असताना तुम्हाला कारवाई करता आली नाही का? असे अधिकाऱ्यांना विचारतात अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. नदीपात्रातील कचरा उचलून नदी स्वच्छ करा, यासाठी जेसीबी ऐवजी दोन ते तीन कर्मचारी लावा. शहरात कचरा वेचक आणि भंगारवाले कचरा उचलण्यासाठी मदतच करतात. कचरा वेचकांच्या मदतीने कचऱ्याचे वर्गीकरण करता येते. तसेच भंगारवाले देखील मदत करतात. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांचे सहकार्य घ्या अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
...तर निलंबित केले असते
आरेफ कॉलनीची अवस्था पाहून आयुक्त आस्तिककुमार पांडेय चांगलेच संतापले होते. पाहणीचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला निलंबीत करत नाही,अशा शब्दात त्यांनी वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशीत अधिकारी वामन कांबळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
आयुक्त दुचाकीवर फिरून करणार पाहणी
आयुक्त अस्तिकुमार पांडेय यांनी पहिल्या दिवशी आरेफ कॉलनीत फिरुन पाहणी केली. त्यानंतर बुधवारपासून (दि.११) सर्व वॉर्डात दुचाकीवरुन फिरून पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वॉर्डात फिरताना वॉर्ड अधिकारी, नगररचना अधिकारी, इमारत निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मालमत्ता अधिकारी, पाणी पुरवठा अभियंता, वॉर्ड अभियंता यांनी सोबत राहावे अशी सूचना केली.