Friday, June 7, 2019

खासदारांचे नाव न टाकल्याने उद्या उद्यानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार करून उध्वस्त करू- अरूण बोरङे यांचा ईशारा

औरंगाबाद-युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क
  मनपा औरंगाबाद येथे उद्या प्राणी संग्रहालयातील
वाघाच्या चार बछङयाचे नामकरण सोहळा होणार असल्याचे माहिती मिळताच एम.आय.एम चे विरोधी पक्ष नेता सरिता अरूण बोरङे यांनी मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि उद्या कार्यक्रमावर निषेध करून उध्वस्त करू असा ईशारा सरिता अरूण बोरङे यांच्या कङुन देण्यात आला.
मनपात जातिवाद संदर्भात फक्त विकास कामांतच जातिभेद दिसुन येते सोबत नाव न टाकलयाचे राजकारण आता पेटण्याची तयारी दिसते.
आता मनपा पत्रिका बदलते का यावर शहर वासियाचे लक्ष वेधले आहे.

हिच ती छापलेली पत्रिका


Sunday, June 2, 2019

‘मुंबई-दिल्ली’ महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण – नितिन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्याचा समावेश आहे. मोदींच्या केंद्रीय मंत्रिपदमध्ये सलग दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच येणाऱ्या काळातील  देशभरात महामार्गाच्या विकास कामाबद्दल त्यांनी पत्रकारांना आराखडा सांगितला.
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुंबई दिल्ली महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच त्यांनी देशभरात महामार्गाच्या शेजारी 125 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस असल्याचंही सांगितलं

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...