Saturday, May 18, 2019

आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यात 8 चारा छावण्या मंजूर तर 6 प्रस्तावित

सिल्लोड येथील चार छावणीचे आज होणार उदघाटन

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मिळणार दिलासा

सिल्लोड (प्रतिनिधी) दि 18,
सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळावा व जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतुने माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने नॅशनल एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत सिल्लोड येथे जनावरांसाठी शासनमान्य चारा छावणी उभारण्यात आली असून रविवार ( 19 ) रोजी माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता या चारा छावणीचे उदघाटन सम्पन्न होणार आहे.  या उदघाटन सोहळ्यास सिल्लोड व परिसरातील शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन नॅशनल एज्युकेशन सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.
   
      सिल्लोड तालुक्यात गेल्या 4-5  वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यवृष्टी होत आहे. यावर्षी तर पावसाने 50 टक्केही सरासरी गाठली नाही. त्यामळे चारा व पाण्यासाठी जनावरांची अवहेलना होत आहे. आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड- सोयगाव तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचे विदारक चित्र  मुख्यमंत्री, पालकमंत्री व महसूलमंत्री यांच्यासमोर मांडून चारा छावण्यां संदर्भात चर्चा केली. या समस्येसाठी आ.अब्दुल सत्तार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तालुक्यात चारा छावणी सुरू करण्यासाठी विविध संस्थांना निमंत्रित केले. सिल्लोड तालुक्यातून 14 चारा छावण्याचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्या होत्या. आज जवळपास सिल्लोड सह बनकीन्होळा , शिवना,अजिंठा,रहिमाबाद,अंभई,बोरगाव बाजार तसेच अंधारी अशा 8 छावण्या सिल्लोड तालुक्यात मंजूर करण्यात आल्या असून उर्वरित घाटनांद्रा, नानेगाव , पळशी , गोळेगाव, चिंचवन, पिंपळगाव पेठ येथील चारा छावण्या प्रस्तावित आहेत.त्यातील आज रोजी सिल्लोड येथील चारा छावणीचे उदघाटन सम्पन्न होणार आहे.

    या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्षा राजश्री निकम , नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर , बाजार समितीचे संचालक दामुअण्णा गव्हाणे , सतीश ताठे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, यांच्यासह सिल्लोड नगर परिषदेचे नगर सेवक आदींची उपस्थिती असणार आहे.

  शहरातील औरंगाबाद - जळगाव हायवे रस्त्यावरील सिल्लोड नगरपरिषद जलशुध्दीकरण केंद्रासमोरील गट नं.372 मध्ये सदरील चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतक-यांना आपली जनावरे चारा छावणीमध्ये दाखल करावयाची आहे त्यांनी पुढीलप्रमाणे अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. (1)विहीत नमुन्यातील अर्ज (2) 7/12 उतारा व 8 अ उतारा (3) प्रतिज्ञापत्र (4)तलाठी यांचा नाहरकत दाखला (5) जनावरे स्वस्थ असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपञ (6) तहसिलदार किंवा प्राधिकृत अधिका-याचे जनावर दाखल करण्यासंदर्भात आदेश (7)राशन कार्ड झेराॅक्स (8) मतदान कार्ड/आधारकार्ड झेराॅक्स या कागदपञांची पुर्तता करणे आवश्यक आहे. चारा छावणी मध्ये एका शेतक-याचे जास्तीत जास्त 5 जनावरे दाखल करता येतील.

सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळावा व जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतुने तालुक्यात सहा चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली असुन पुढील आठवड्यात बनकिन्होळा परिसरात चारा छावणी सुरु करण्यात येणार असुन उर्वरित शिवना,अजिंठा,रहिमाबाद,अंभई,बोरगाव बाजार या पाच चारा छावण्या सुरू करण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी आवश्यक संमती पञांची पुर्तता तात्काळ करावी असे आवाहन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे .


आ.अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने मंजूर व  प्रस्तावित चारा छावण्यांची नावे व गट क्र. खलील प्रमाणे
मंजूर चारा छावण्या
सिल्लोड ( गट क्र. 372 ) , शिवना ( गट क्र. 689 ) , अंभई ( गट क्र. 210 ) , बनकिन्होळा ( गट क्र. 07) , अजिंठा ( गट क्र. 13 ) , रहिमाबाद  ( गट क्र. 459 ) , बोरगाव बाजार ( गट क्र.80 )


प्रस्तावित चारा छावण्या

घाटनांद्रा ( गट क्र. 02 ) , नानेगाव ( गट क्र. 219 ) , पळशी ( गट क्र. 345 ), गोळेगाव ( गट क्र. 66 ) , चिंचवन ( गट क्र. 150 ), पिंपळगाव पेठ ( गट क्र. 13 ) ,

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...