Tuesday, February 12, 2019

*आजकाल दर रविवारी विविध गावातुन नव- पुढारी स्वतःला मिरविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा आजोजीत करून तरुण पिढी बरबाद करण्यासाठी ची वाटचाल सुरु आहे असा माझा आरोप आहे.*

मध्यंतरी MPSC स्पर्धा साठी मोफत आयोजन करूनही क्रिकेट मुळे.... इच्छुक न मिळाल्याने आयोजित कार्यक्रम रहित केल्याची दुर्दैवी पोस्ट होती..

अश्या या सर्वांसाठी खालील👇पोस्ट नक्कीच वाचा.






🌷🌷 *असही आदर्श गाव* 🌷🌷
*उत्तरप्रदेशातल्या जौनपूर जिल्हातलं माधौपूर नावाच गाव.* UPSC चा निकाल लागला कि कोणत्या घरातून कोणाचा नंबर लागला इतकीच चर्चा या गावात होतं असते. बरं या गावात किती घरं आहेत तर 75. होय फक्त 75. *आणि या गावातून IPS असणारे अधिकारी किती आहेत तर 45.* आत्ता हिशोब लावून विचाराल की बाकीच्या 30 घऱातल्याचं काय? तर ऊत्तर आहे बाकीच्या घरात पण IAS, IRS, IFS आहेत.

*सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना UPSC चा नाद लागण्यासाठी कोणताहा फाऊंडेशन कोर्स, क्रॅश कोर्स, अनअॅकडमी व्हिडीओ किंवा मी स्टेशनवर राहिलो, वडापाव खाल्ले टाईप भाषण कारणीभूत नाहीत.* पण हा गावकऱ्यांना हा नाद लागण्यापाठीमागे एक माणूस मात्र नक्कीच आहे.

*तसा या गावातून पहिला प्रशासकिय सेवेत जाणारा युवक म्हणून मुस्तफा हुसैन यांच नाव घेतलं जातं.* ते 1914 साली प्रशासकिय सेवेत दाखल झाले होते. पण गावकऱ्यांना अशी प्रथा अंमलात आणायला 1952 साल उजडावं लागलं. *1952 साली इंन्दूप्रकाश नावाच्या युवकाने UPSC च्या परिक्षेत 13 वी रॅन्क घेतली.* तिथून पुढे मात्र प्रत्येकाला UPSC चा नाद लागला.  *इंदूप्रकाश यांच्यानंतर गावातले चार सख्खे भाऊ, होय होय सख्खे म्हणजे एकदम सख्खे चुलत वगैरे अस नाही. तर या चार सख्या भावांनी एकाच वर्षी पोस्ट काढली. एकाच वर्षी चारही जणं IAS झाले.* या घटनेनंतर जोर वाढू लागला. त्यानंतर दोन सख्ये भाऊ IAS झाले. पुढे प्रत्येक घरात कोण ना कोण पास होत गेला. आणि UPSC तून पोस्ट काढणं हि गावची परंपरा झाली. पण इतक्यातवरच हे थांबत नाही. *गावातली मुलं UPSC पास झाली पण गावाला विसरली नाहीत.* आजही प्रत्येकजण गावात येतो. येतो म्हणजे पाहूण्यासारखं एक दोन दिवस नाही तर सर्वांची घर आजही याच गावात आहेत.

आत्ता मुलं पोस्ट काढत होते म्हणून मुली मागे राहिल्या वगैरे टाईप गोष्टी देखील इथे नव्हता. या गावातल्या मुली देखील मुलांच्या वरती होत्या. *आशा सिंह, उषा सिंह या बहिणी, चंद्रमौली सिंग या आयपीएस अशा कित्येक मुलींनी देखील UPSC तून पास होत या गावची परंपरा पुढे घेवून जाण्यास हातभार लावला आहे.*

*या गावातील विशेष व्यक्ती अन्जमेय सिंह आज मनिला येथील जागतिक बॅंकेत आहेत. डॉ. नीरू सिंह आणि लालेंद्र प्रताप भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे उच्चाधिकारी आहेत, ज्ञानू मिश्रा इस्त्रो मध्ये आहेत याशिवाय वेगवेगळ्या राज्यात सचिव, पोलिस महासंचालक यांसारख्या पोस्टवर देखील गावातील व्यक्ती पोहचल्या आहेत.*

असो हे झालं त्यांच्या गावाच आपल्या गावाचा आत्ता मुळशी पॅटर्न करायचा हि अस काही करायचं ते तुमच्या हातात आहे. *बघा वेळ झाला असला तरी, गावचा पहिला म्हणून परंपरा सुरू करायला हरकत नाही.*

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...