Tuesday, February 12, 2019

भाजपाच्या मोदी भक्तांनो,भाईयो और बहनो......मेरे देश वासियो.........
*आता आमची ‘मन की बात’.*

सासू-सासरे पाहून कोणी आयुष्याचा जोडीदार निवडत नसतं पण तरीही मी मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून कोणालाही मतदान करण्यास तयार आहे; फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत.

*माझे असे मत आहे की, जुनी आश्वासने पूर्ण केल्याशिवाय नवीन आश्वासने दिली तर त्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. तेव्हा मा. पंतप्रधानांनी २०१९ साठी नवीन स्वप्ने दाखवण्यापेक्षा जुन्याच आश्वासनांच्या व स्वप्नांच्या पूर्ततेबाबत बोलावं.*

1] २०१४ च्या निवडणुकीपूर्वी देशाच्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलेले होते का ?
*जर आठवत असेल तर तशी रक्कम प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जमा झाली का ?*
जर उत्तर ‘नाही’ असेल तर मग मी तुमच्या नावावर मतदान का करू ?

काही दिवसांपूर्वी एका भक्ताने कविता पाठवली होती, ‘पंधरा लाख कसले मागता ? मोदींचा प्रत्येक शब्द लाखमोलाचा’. मान्य. पण साहेब, तुमची भाषणे ऐकवून लाख सोडा एका रुपयाच साहित्यसुद्धा भारतीय दुकानदार देत नाहीत हो. त्यामुळे ज्यांना या लाखमोलाच्या शब्दांचा संग्रह करायचा आहे त्यांनी खुशाल करोडोंची तिजोरी भरून ठेवावी. मला फक्त एवढेच सांगा, देशाच्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले नसताना त्यांना मतदान का करावं ?

2] १०० दिवसांत स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते का ?
जर आठवत असेल तर दिवस मोजायला चुकलात का ?
जर आता तुम्ही आंतरराष्ट्रीय कारणे देत असाल तर स्विस बँक २०१४ च्या निवडणुकीनंतर स्विस बँक तुमच्या अखत्यारीत येणार होती का ?
*जर तुमच्याच नियोजनानुसार सव्वा तीन महिन्याचं काम सव्वा चार वर्षे पूर्ण होत नसेल तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा ?*

3) मोदीजी तुम्ही दर वर्षी 2 करोड तरूनांना रोजगार देण्याचे आस्वासन दिले होते हे तुम्हाला आठवते का ?
*आठवत नसेल तर तुमची 2014 च्या निवडणुकीतील भाषणे ऐका* दर वर्षी 2 करोड तरूनांना रोजगार देने तर सोडाच पण ते करीत असलेला छोटामोठा रोजगारही तुम्ही देशातील 24 लाख लघु उद्योग नोटबंदी करून हिरावले.

4] पेट्रोलची किंमत पस्तीस ते चाळीस रुपये होईल असे आश्वासन दिले होते का ?
*जर आठवत असेल तर आश्वासनपुर्तीसाठी २०१९ ची निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहत आहात का ?*

5] सिलेंडर ४०० रुपयांचे झाले म्हणून तुम्ही आंदोलने केली होतीत. आज आम्ही ८०० रुपये मोजत आहोत.
*सिलेडरच्या किमतीविषयी तुम्ही काही आश्वासने दिली होतीत का ? बघा आठवली तर ...*

6] मोदीजी तुम्ही ‘एक रुपया म्हणजे सत्तर डॉलर होणार’ असे काही बोलले होतात का ?
आजची किंमत नेमकी उलट असल्याचे ऐकत आहे.

7] मोदीजी तुम्ही शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते ?
*मग शेतकर्यांना खर्च वजा जाता दिडपट भाव दिला का ?जर आठवत असेल तर उत्तर द्या, शेतकऱ्यांना आंदोलने का करावी लागली ?*

8] नोटाबंदीच्या काळात तुम्ही  ‘फक्त ५० दिवस त्रास सहन करा’ असे भारतीयांना आवाहन केले होते का ?
*मग 50 दिवस सोडा तीन वर्षांनी ‘नोटाबंदी फसली’ असे रिजर्व बँकेने का जाहीर केले ?*

9] मोदीजी तुमची मूळ विचारसरणी  ‘हिंदूराष्ट्र’ असताना कमीत कमी जातीय ऐक्य तरी तुम्हाला साधता आले का ? *हिंदु म्हणून तुम्ही ब्राम्हणेतर जातीसाठी काय केले ? त्यांच्या ऊन्नतीसाठी काय केले ?*
वेगवेगळ्या जाती रस्त्यावर का उतरत आहेत ?

10] विदेशी कंपन्या भारतात येण्यासाठी मोदी अर्धे जग फिरून आले आणि स्वामी रामदेव बाबा म्हणतात, ‘स्वदेशी वापरा, विदेशी हटवा’. *एकदा एकमेकांची भेट घेऊन नक्की काय करायचं ते ठरवाल का ?*

11] कॉंग्रेसच्या काळात कर्ज घेणारे *विजय माल्या, ललित मोदी, निरव मोदी वगैरे लोक भाजपच्या काळात देशाबाहेर गेले कसे ?* भारतीय सामान्य जनतेला माहित नाही असा कोणता मार्ग त्यांना सापडला ?

12] मा. नरेंद्र मोदीजी ‘एक सर के बदले दस सर लायेंगे’ असे काही म्हणाले होते का ?
*मग जवानांच्या हौतात्म्यानंतर दहापट सर मागवण्याऐवजी साखर कशी मागवली ?*
ज्या मात्या-पित्यांनी पुत्र गमावला, ज्या पत्नीने पती गमावला, ज्या मुलांनी पिता गमावला त्यांना त्या साखरेची चव गोड  असेल का ? *अशा वेळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम सांगताना ५६ इंचांची छाती तेवढीच राहते का ?*

13] तुम्ही सांगता, सत्तर वर्षांत अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या. बरोबरच आहे. *कालपर्यंत जनता न्यायाधीशांकडे न्याय मागायला जात होती. पहिल्यांदाच न्यायाधीश जनतेकडे न्याय मागायला रस्त्यावर आले.* न्यायाधीशांनाच न्यायप्रणालीवर विश्वास राहिला नाही का ?

14] बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबाद असावी की  काश्मीर- कन्याकुमारी ? की मुंबई/अहमदाबाद- कोलकाता ? ‘संपत सरल’ या हास्यकवीने सुंदर रचना केली,
*बुलेट ट्रेन करार होणे के बाद दुसरे दिन मोदीजी जपानी पंतप्रधान को बनारस ले गये और तीन घंटोतक गंगा आरती दिखाई| तो उन्होने पुछा, जब आपके पास इतनी फुरसत है तो बुलेट ट्रेन क्या करनी है ?*

15] २०१२ च्या निर्भया प्रकरणानंतर रस्त्यावर उतरणारे तुम्ही *आसिफा प्रकरणानंतर का शांत बसले होते ?*

16] उत्तर प्रदेशमध्ये ६० लहान मुले ऑक्सिजनशिवाय मरण पावली असताना *आम्ही दहा लाखांचे कोट का घालून फिरत आहोत ?*

17] ‘आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो आहोत’ *असे विधान करणारे अनंतकुमार हेगडे अजूनही, असे विधान केल्यानंतरही संसदेत मंत्री बणून कसे येतात ?*

18] हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विघातक शस्त्रांसह पकडल्यानंतर  *A.T.S. च्या प्रमुखांची बदली का होते ?*

19] ज्या संविधानातील कलमांचा आधार घेत मोदीजी पंतप्रधान झाले *त्याच संविधानाच्या प्रती जाळून टाकणाऱ्या संघटनांवर अजून कारवाई का होत नाही ?*

20] इराक-सिरीया येथे मुस्लीम धर्मरक्षणासाठी (?) निरपराध मुस्लीम लोकांची कत्तल करणाऱ्या मुस्लीम संघटनांना आपण ‘आतंकवादी’ म्हणतो *मग हिंदुस्थानातील हिंदू धर्मरक्षणासाठी (?) निरपराध हिंदू लोकांना गोळ्या घालणाऱ्या व बॉंब तयार करणाऱ्या हिंदू संघटनांना आपण  ‘आतंकवादी’ म्हणणार का ?*

21] *उमेदवारांना शून्य मते मिळत असताना निवडणुकीसाठी मशीनच वापरण्याचा अट्टाहास का ?* उमेदवारांनी स्वत:लाही मतदान केले नाही असे आपण म्हणू शकतो का ?

*मोदीजी, मी तुमचा फक्त टीकाकार नाही बरं का, तुमच्या भाषण शैलीचा मी जबरदस्त चाहता आहे पण भाषणांमुळेच सत्ता मिळत असती तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांचे पक्ष कधीच हरले नसते.*

मोदीजी तुमच्या सर्जिकल स्ट्राईकचा मी जबरदस्त पुरस्कर्ता आहे *पण जेव्हा एक जवान ‘आम्हाला खायला अन्न मिळत नाही’ अशी जाहीर माहिती देतो तेव्हा मन खट्टू होतं.*

मोदीजी तुमच्या मार्केटिंग स्टाईलचा मी जबरदस्त चाहता आहे पण *वीतभर नफ्याची जाहिरात हातभर खर्च करून लोकांपर्यंत पोहचवली जाते असे ऐकतो, वाचतो तेव्हा नफ्याविषयीच शंका येते.*

*मोदीजी*, तुमची कथा सांगण्याची पद्धत अफलातून आहे. तुम्ही जर शिक्षक झाला असता तर नक्कीच विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते विद्यार्थी झाला असतात पण *गटारीच्या ग्यासवर चहा तयार करण्याची तुमची कथा ऐकली. साहेब, इतके जबरदस्त अविष्कार आपल्याला सिध्द करावे लागतील* नाहीतर लोक विश्वास ठेवत नाहीत. लहान मुलेसुद्धा विनोद म्हणून हसतील हो.

एक ते पंतप्रधान होते जे बोलतच नव्हते पण जनहित व देशहिताचे कामे करून ज्यांनी देशाचा मान जगात उंचावला आणि एक हे आहेत जे बोलतच राहतात पण करत काहीच नाही, *तसंही काही करण्यासाठी काही समजलंही पाहीजे ना ?* म्हणून आज ‘आमची मन की बात’ मांडली.

*मोदीसमर्थक समर्पक उत्तरे द्या,१००% मोदींना मत देईल. नाहीतर माझे मत...*

*तसंही माझ्या एका मताने असा काय फरक पडणार आहे ? पण मी माणूस म्हणून माझ्या मनातील रास्त प्रश्न माझ्या 10 मित्रांना पाठविणार, आपणही तसेच करा व जनतेच्या, भारताच्या व भारतीय संविधानाच्या जिवावर उठलेल्या भाजपाच्या मोदी सरकारला 2019 च्या निवडणूकीत सत्तेतून हाकलत या.*

*जय हिंद, जय भारत, जय संविधान*

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...