Monday, February 11, 2019

महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका औरंगाबाद व एमसीइडी यांच्या संयुंक्त विद्यमाने मार्गदर्शन
       
          युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क फोटो

आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका औरंगाबाद व एमसीइडी यांच्या संयुंक्त विद्यमाने  संत तुकाराम महाराज नाट्यगृह सिडको येथे महिला बचत गट व महिला उद्योजिका यांच्या साठी उद्योजकता मार्गदर्शनपर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महिला बाल कल्याण समिती सभापती श्रीमती माधुरी अदवंत ह्या होत्या. यावेळी एमसीईडी चे श्री बिंगार बीने ,श्री नलावडे ,श्री शिंदे ,मनपा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा थेटे,यशस्वी उद्योजिका श्रीमती रेखा वाहटुले तसेच 300  महिलांची यावेळी उपस्थिती होती.
   यावेळी मा महापौर यांनी या कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी  आपल्या कॉलेज जीवनात एमसीईडी तर्फे उद्योग उभारण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा उल्लेख केला व जवळपास १००० ते १२०० विद्यार्थ्या मधून फक्त ३० जणांची निवड झालेल्या मध्ये त्यांची निवड झाली होती हे हि त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.तसेच यावेळी एमसीईडी च्या अधिकारी यांनी उद्योग कसा करावा व उद्योग उभारण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा याचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले. तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती माधुरी अदवंत व महिला बाल कल्याण विकास अधिकारी श्रीमती अपर्णा थेटे यांनी महिलांना याबद्दलचे मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       तसेच आज महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका यांच्या वतीने मनपा कचरा वेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संत तुकाराम महाराज नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती माधुरी अदवंत ह्या होत्या. यावेळी मनपा आरोग्य विभागाच्या डॉ परदेशी, डॉ सोनी,डॉ वृषाली ,श्री विष्णू चव्हाण , श्री अरुण चौधरी, मनपा महिला कचरा वेचक अध्यक्ष श्रीमती आशाताई ढोके,श्रीमती साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी जवळपास २००   कचरा वेचक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यात मधुमेह ,एच आय व्ही शुगर , हिमोग्लोबिन इ.तपासण्या करण्यात आल्या.तसेच यावेळी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून उद्योजक महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे व कचरा वेचक महिलांना मोफत आरोग्य तपासणी मार्फत आरोग्याचे वाण यावेळी देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...