Tuesday, March 8, 2022

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०८ मार्च रोजी आय. सी. ई. ई. एम. कॉलेज, वाळूज, औरंगाबाद येथे महिला दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. डॉ. रोहिणी काचोळे, मां गादिया, एम. एस. एम. ई. चे असिस्टंट डायरेक्टर सुभाष इंगेवार, आय. सी. ई. ई. एम. कॉलेज चे अध्यक्ष मा. डॉ. सुभाष झवर, जन शिक्षण संस्थानच्या अध्यक्ष मा. डॉ. कल्पनाताई झवर, रमाकांत पुलकुंडवारआय. सी. ई. ई. एम. कॉलेज चे संचालक डॉ. सी.एस. पद्मावत, जन शिक्षण संस्थान चे संचालक रणधीर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांचे प्रतिमापूजन करण्यात येऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिपमाला बिरादार यांनी केले. तसेच जन शिक्षण संस्थांनच्या उपक्रमाबद्दल रणधीर गायकवाड यांनी उपस्थिती मान्यवरांना माहिती सांगितली. यावेळी विविध नामांकित क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कल्याणी पुलकुंडवार-औदयोगिक क्षेत्र, डॉ.दिपमाला बिरादार- कार्यालय प्रशासन, रेखा चांदे, गायत्री पटेल- पोलीस विभाग, , प्रियांका बडुगे, डॉ. जयश्री भांडवलदार, वंदना धनेश्वर, पल्लवी बाहेकर, अंबिका टाकळकर, डॉ. निता पाडळकर- आरोग्य क्षेत्र, संगीता भावसार, शीतल कदम, रेणूका फलके, भैरवी बागुल आणि पाटोदा ग्रामपंचायत महिला पदाधिकारी इ. तसेच जन शिक्षण संस्थानच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक वैशाली आनंदे-दौलताबाद, बुऱ्हाणा पठाण-दौलताबाद, सीमा वर्मा- चिकलठाणा, ममता आंबेकर-वेरूळ, सुजाता उदावंत-मिलटरी कॅन्टोन्मेंट बोर्ड, नंदाबाई सोनवणे- जोगवाडा तांडा, अंजना नंदिले- गावंदरी तांडा - पैठण, हर्षदा गायकवाड-निसर्ग कॉलोनी इ. प्रशिक्षिकांचे सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जन शिक्षण संस्थान चे प्रशिक्षण घेऊन ज्या लाभार्थींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला अश्या शिवानी चौपाडवर - ब्युटीशियन, समिक्षा कापकर- जूट फॅक्टरी, रेखा राजहंस- बुटीक, यामिनी राठोड-ब्युटी पार्लर, सविता पारधे- ब्युटी पार्लर प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर ज्वेलरी व जुट प्रदर्शन लावणाऱ्या वैशाली वानखेडे व मोहिनी रेशवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध प्रशिक्षण वर्गांचे प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यशस्वी लाभार्थींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात मा. डॉ. रोहिणी काचोळे , स्त्री रोग तज्ञ यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात महिलांनी स्वतःच स्वतःची पाठ थोपटुन आपले कौतुक करायला हवे. तसेच आपले घर आणि सासूबाईला मनापासून सांभाळ करावा यामुळे कुटुंब व कुटुंबाबाहेर देखील आपले महत्व वाढते, असे सांगीतले. एम एस अँ ई चे अससिस्टन्ट डायरेक्टर सुभाष इंगेवार यांनी महिलांना नवीन उद्योग सुरु करण्याकरिता उद्यम रजिस्ट्रेशन करावे, यामुळे सरकारी योजनांचे कर्ज मिळवणे सुकर होईल व आपला व्यवसाय सुरु करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मा. डॉ. कल्पनाताई झवर यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छापर संदेशात बोलताना महिलांना कुठल्याही क्षेत्रात काम करण्यास संधी मिळाल्यास त्याचे सोनं करतातच, याविषयी अभिमान वाटतो असे मत मांडले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अच्युत भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला जन शिक्षण संस्थान च्या सर्व जिल्यातील प्रशिक्षिका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शीला लखमाल, पौर्णिमा कुलकर्णी व रजनी खंडारे, अनिता पोटे, प्रवीण बागले, राजू बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...