शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॕकेज जाहीर करा; अन्यथा सरकारच्या विरोधात आंदोलन - अरुण निटुरे
औरंगाबाद - केंद्र शासनाने उद्योगपतींना आर्थिक पॕकेज जाहीर केले. तसेच आर्थिक पॕकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करावे, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारु, असा इशारा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी सुभेदारी विक्ष्रामगृह येथे दि. 13 रोजी आयोजित पञकार परिषदेत दिला.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेक्ष्राम, प्रदेश अध्यक्ष अर्जुनराव गालफाडे, प्रदेश सरचिटणीस मारुती गायकवाड, जालना जिल्हाध्यक्ष कैलास सरकटे, कॕप्टन अरविंद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना निटुरे म्हणाले, शासनाने उद्योगपतींना मदत केली. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॕकेज जाहीर करावे. तसेच कोरोना आजाराने डॉक्टर, पोलिस, पञकार यांना 50 लाख केंद्र शासनाने तर 25 लाख राज्य शासनाने आर्थिक मदत म्हणून द्यावे. तसेच कोरोनामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.त्यांनाही शासनाने मदत करावी. तसेच नवीन सरकार सत्तेवर येताच सत्ताधारी विद्युत कंपनी तयार करतात आणि सामान्यांना नागरिक, शेतकऱ्यांची लुट करतात.नवीन मीटर लावतात. यामुळे मोठा भ्रष्टाचार होत आहे. या प्रश्नांवर शासनाने योग्य विचार करावा आणि पिडितांना मदत करावी अन्यथा भविष्यात केंद्र सरकार विरोधात जंतरमंतरवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निटुरे यांनी दिला.
आगामी महानगरपालिका निवडणूक पक्ष सर्व जागा स्वतंत्र लढणार आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आम्ही रस्ते, पाणी, कचरा, नागरी समस्या आदी प्रश्नावर लढणार आहोत. पुढील निवडणुकीत आमच्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे असतील आणि निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे यांनी पञकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्योगपतींना 1 लाख 72 हजार कोटींचे पॕकेज जाहीर केले. माञ शेतकऱ्यांना वेगळा न्याय असा सवालही त्यांनी केला. कोरोनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे, हे थांबले पाहिजे अन्यथा येत्या काळात सरकार विरोधात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सोमनाथ गालफाडे, स्वप्निल गालफाडे, रंगनाथ भालेराव, शिरधूर गंगावणे, विलास सरकटे, माणिकराव गालफाडे, चंद्रकांत तारतोडे, पवन कुमार, दीपक साळवे, संग्राम घाटे आदींची उपस्थिती होती.